काळभैरवनाथ देवस्थानचा तीर्थक्षेत्रात समावेश करू : पालकमंत्री राधाकृष्ण विखे | पुढारी

काळभैरवनाथ देवस्थानचा तीर्थक्षेत्रात समावेश करू : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा : पारनेत तालुक्यातील पुणेवाडी येथील जागृत देवस्थान श्री. काळभैरवनाथ देवस्थानचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करून देवस्थानच्या विकासासाठी निधी देऊ, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पुणेवाडी (ता. पारनेर) येथे पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्ता पुणेवाडी ते गणेश खिंड रस्ताकामाचा प्रारंभ, 33 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या लोकार्पण व काळभैरवनाथ देवस्थानच्या भक्ती पंढरी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे बोलत होते.

याप्रसंगी माजी सभापती काशिनाथ दाते, सीताराम खिलारी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, माजी सभापती गणेश शेळके,माजी सरपंच सुहास पुजारी,सरपंच दीपाली रेपाळे, भैरवनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष सीताराम पुजारी, दिनेश बाबर, बाबासाहेब खिलारी, सचिन वराळ, राजाराम एरंडे, मारुती रेपाळे, आश्विनी थोरात, सुभाष दुधाडे,युवराज पठारे, पंकज कारखिले, लहू भालेकर,रवींद्र पुजारी, शैलेंद्र औटी, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सुरेश पठारे, पोपट मोरे, अशोक चेडे, भास्कर पोटे उपस्थित होते.

विखे म्हणाले, लोकांच्या हाती सत्ता गेली पाहिजे. लोकांनी ठरवले पाहिजे गावचा विकास कसा करायचा, म्हणून जनतेतून सरपंच निवडीची भूमिका भाजपने घेतली. जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम सुरू आहे, यासाठी चार हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. सन 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरांमध्ये नळाने पाणी गेले पाहिजे, असा पंतप्रधानांचा संकल्प आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे राज्यातील जनतेला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार मिळणार आहेत. देशाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. शेतजमीन मोजणीसाठी नवीन तंत्रज्ञान आणल्याचे त्यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यात गतवर्षी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी 44 हजार शेतकर्‍यांना चाळीस कोटी रुपयांची मदत दिली. अजून सात कोटी रुपयांची मदत शेतकर्‍यांना देणे बाकी आहे, ती लवकरच मिळेल. असेही मंत्री विखे म्हणाले.
प्रास्ताविक बाळासाहेब रेपाळे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले. रवींद्र पुजारी यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button