Chinese coal company office fire : चीनमध्ये कोळसा कंपनी कार्यालयास भीषण आग, २५ जणांचा होरपळून मृत्‍यू | पुढारी

Chinese coal company office fire : चीनमध्ये कोळसा कंपनी कार्यालयास भीषण आग, २५ जणांचा होरपळून मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: चीनच्या उत्तर शांक्सी प्रांतात कोळसा कंपनीच्या कार्यालयाच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात माेठ्या कोळसा उत्पादक योंगजू कोल कंपनीत ही दुर्घटना घडली. आज ( दि.१६) सकाळी ६.५० वाजता ही दुर्घटना घडल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. (Chinese coal company office fire)

राज्य प्रसारक सीसीटीव्हीने सुरुवातीला कोळसा कंपनी कार्यालयात लागलेल्या आग दुर्घटनेत ११ लोक ठार आणि किमान ५१ जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर या दुर्घटनेतील मृतांची संख्येत वाढ झाल्याचे दोनवेळा स्पष्ट करण्यात आली. सध्या या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ही २५ झाली असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, तपास सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Chinese coal company office fire)

यापूर्वी बीजिंगमधील हॉस्पिटलला आगीत २९ लोकांचा मृत्यू

यापूर्वी चीनमध्ये एप्रिलमध्ये बीजिंगमधील हॉस्पिटलला आग लागली होती. यामध्ये २९ लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भीषण आगीच्या दुर्घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. या घटनेवरून सोशल मीडिया साइट्सवर स्थानिक अधिकाऱ्यांची टीका केली होती. (Chinese coal company office fire)

येथील कोळसा खाणीतील उत्पादनाचा तोल ढळला

चीनमधील कोळसा खाणीत अलिकडे घडलेल्या काही अपघातांमुळे येथील कोळसा खाणी अडचणीत आहेत. तसेच यामुळे या घटणांमुळे सुरक्षा तपासणी युद्धपातळीवर सुरू असल्याने खाणींचे काम थांबवले आहे, यामुळे कोळसा उत्पादनाचा तोल ढळला असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button