Pune News : विरोधकांचे वकीलही शरद पवारांना बोलतात ‘सॉरी’ | पुढारी

Pune News : विरोधकांचे वकीलही शरद पवारांना बोलतात ‘सॉरी’

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : कोर्टात विरोधकांचे वकीलदेखील शरद पवार यांना भेटल्यानंतर ‘सॉरी’ म्हणतात. दोन्ही बाजूचे वकील माझे दोस्त आहेत. त्यामुळे मी चहा एकाबरोबर घेते लढते आणि जेवण एकाबरोबर करते त्यामुळे लोक म्हणतात की, हे काय चाललंय पण मी त्यांना प्रेमाने म्हणते ‘आपली दोस्ती एक तरफ आपली लढाई एक तरफ’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले

बोरी (ता. इंदापूर) येथील नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. 13) संवाद साधला, त्या वेळी सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मतदारसंघातील कामाचा अर्धा वेळ हा केस लढण्यात जात आहे. मतदारसंघ बघायचा, कामे बघायची की कोर्टाच्या केसेस पाहिजे. शरद पवार स्वतः जातात. मात्र, जनाची नाही मनाची तरी आहे आणि 80 वर्षांच्या वडिलांना एकटे जाऊ देईल का कोर्टात, असे म्हणत आता न्यायालयीन लढा लढताना मजा यायला लागली ‘हरेंगे या जितेंगे ये बाद मे देखेंगे मगर लढेंगे जरूर !’ असा टोला सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

कोर्टाची पायरी चढलोय आता उतरायचे नाही. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची निकालाची भीती वाटत नाही. कारण आपण खरे आहोत.निवडणूक आयोग कधी निकाल देते माहिती नाही ते किती दिवस चालेल. वकिलांबरोबर आता राहायची सवय झालीय बरेच दिवस वकील नाही भेटले तर कसं तरी वाटतं. त्यामुळे मतदारांनी मला समजून घ्या. मी मतदारसंघातून गायब झाले नाही अशी मिश्कील टिप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा

धक्कादायक ! महिलेसह तिच्या ३ मुलांची चाकूने भोसकून हत्या; तपासासाठी ५ विशेष पोलिस पथकांची नेमणूक

गोव्यात आणले जाणारे 15 कोटींचे ड्रग्ज मुंबईत जप्त

Pune News : पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान

Back to top button