Haris Rauf ने केली पाकिस्तानची फजिती, 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये नोंदवला लाजिरवाणा विक्रम | पुढारी

Haris Rauf ने केली पाकिस्तानची फजिती, 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये नोंदवला लाजिरवाणा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Haris Rauf : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे शनिवारी स्पर्धेच्या 44 व्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान, पाकच्या वेगवान गोलंदाज हरिस रौफने आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे. हरिस हा एका विश्वचषकात गोलंदाज म्हणून सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज ठरला आहे.

यंदाच्या वनडे विश्वविश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यांचे फलंदाज किंवा गोलंदाज काहीही चमत्कार करू शकले नाहीत. त्यातच वेगवान गोलंदाज हरिस रौफ (Haris Rauf) हा खूप महागडा ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळताना त्याने 10 षटकांत 64 धावा खर्च करून 3 बळी घेतले, पण तो विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात एका आवृत्तीत सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदला मागे टाकले, रशीदने 2019 विश्वचषक स्पर्धेत 11 सामन्यात 526 धावा खर्च केल्या होत्या. आदिलनंतर या यादीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाचा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 9 डावात गोलंदाजी केली आणि 525 धावा दिल्या.

विश्वचषकात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

533 धावा : हरिस रौफ (पाकिस्तान, 2023 विश्वचषक)
526 धावा : आदिल रशीद (इंग्लंड, 2019 विश्वचषक)
525 धावा : मधुशंका (श्रीलंका, 2023 विश्वचषक)
502 धावा : स्टार्क (ऑस्ट्रेलिया, 2019 विश्वचषक)
484 धावा : मुस्तफिझूर (बांगलादेश, 2019 विश्वचषक)
481 धावा : शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान, 2023 विश्वचषक)

रौफने (Haris Rauf) चालू स्पर्धेत 9 डावात एकूण 533 धावा दिल्या. विश्वचषकाच्या इतिहासातील एका विश्वचषकात गोलंदाजाने खर्च केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. दरम्यान, रौफने या विश्वचषकात 16 विकेट घेतल्या आणि फक्त एक मेडन ओव्हर टाकली. त्याची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी 3/43 राहिली.

Back to top button