सुशांतच्या आठवणीने अंकिता भावुक! | पुढारी

सुशांतच्या आठवणीने अंकिता भावुक!

‘बिग बॉस -17’ मुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आहे. यादरम्यान अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात अंकिता खूपच भावुक झाल्याचे दिसत आहे. अंकिताच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहेत. व्हिडीओमध्ये अंकिता, अभिषेक कुमारसमोर रडताना दिसत आहे. अंकिता एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबाबत बोलताना दिसत आहे. अंकिता ही अभिषेकला म्हणते की, तू शर्ट न घालता माझ्यासमोर येतोस, त्यावेळी मला सुशांतची खूपच आठवण येते. सुशांत फार रागीट नव्हता. त्याचा स्वभाव प्रचंड शांत होता. तो मेहनती आणि जिद्दी होता. तो छोट्या शहरातून आला होता आणि मोठ्या जागी स्वतःची ओळख निर्माण करणे खूपच कठीण असते. यानंतर अभिषेक म्हणतो की, तुझ्यासोबत सुशांतबाबत यापुढे कधीच बोलणार नाही. यावर अंकिता म्हणाली की, सुशांतबाबत बोलायला मला खूपच आवडते. तोदेखील माझ्यासाठी एक कुटुंब आहे.

Back to top button