Pune News : विजयस्तंभ विकासाची घोषणा हवेतच | पुढारी

Pune News : विजयस्तंभ विकासाची घोषणा हवेतच

पुणे : कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विकासासाठी सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी केली होती. मात्र, अद्याप विकास आराखडाही तयार नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना तीव्र असून, हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शौर्य दिन समन्वय समितीने पत्रकार परिषदेत केली.

अभिवादन शौर्य दिनानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाच्या तयारीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल तुपेरे, मिलिंद अहिरे आदी उपस्थित होते.
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सुमारे 20 लाख आंबेडकरी अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षी 31 डिसेंबर व 1 जानेवारी या दोन दिवस हा सोहळा साजरा करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

त्यानुसार प्रशासनाने तयारी दर्शवली असून, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समितीकडून नियोजन केले जात आहे.
ज्यंदा रविवारी (दि. 31 डिसेंबर) सोमवारी (दि. 1 जानेवारी) असे दोन दिवस सोहळा साजरा करण्यात येणार आहे. मागील वर्षी 31 डिसेंबरला साधारण दीड लाख अनुयायी अभिवादनासाठी आले होते. यंदा संख्या वाढण्याची शक्यता असून, तसे नियोजन सुरू करण्यात आले आहे, असे डंबाळे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button