space station : ४.५ लाख किलो वजनाच्या इंटरनॅशनल स्‍पेस स्‍टेशनची ‘या’ साहित्‍यापासून निर्मिती | पुढारी

space station : ४.५ लाख किलो वजनाच्या इंटरनॅशनल स्‍पेस स्‍टेशनची 'या' साहित्‍यापासून निर्मिती

वॉशिंग्टन : पृथ्वीपासून 400 कि.मी. उंचीवर स्पेस स्टेशन उभारणे हे खूपच आव्हानात्मक काम म्हटले पाहिजे. त्यासाठी अनेक देश पुढे सरसावले आणि आता या घटनेला 23 वर्षे पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे एक-एक भाग अंतराळात नेऊन या विशालकाय स्पेस स्टेशनची उभारणी करण्यात आली आणि आजही ते उत्तम प्रकारे कार्यरत आहे. तब्बल साडेचार लाख किलो वजनाचे हे स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळातील चमत्कार ठरले आहे. कारण, आजही ते मोठ्या दिमाखात अंतराळात तरंगत आहे.

अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’, रशियन स्पेस एजन्सी ‘रोस्कोमोस’, जपानी स्पेस एजन्सी ‘जॅक्सा’, कॅनेडियन स्पेस एजन्सी ‘सीएसए’ आणि युरोपियन स्पेस एजन्सी ‘आयएसए’ यांच्या सहकार्याने याची निर्मिती करण्यात आली आहे. 4.5 लाख किलो वजनाचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नेमके कोणकोणत्या साहित्यापासून तयार झाले, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन स्थापन केले आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या भिंती आणि छताच्या भागासाठी नोमेक्स नावाच्या पदार्थापासून तयार करण्यात आला आहे. हा पदार्थ आग-रोधक आहे. अंतराळातील किरणोत्सार तसेच अत्यंतिक तापमानापासून संरक्षण करण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाह्य भाग थर्मल इन्सुलेशनपासून तयार करण्यात आला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा बाहेरील भाग अ‍ॅल्युमिनियमने बनलेला आहे, काही भाग टिटॅनियम आणि ग्रेफाइट-इपॉक्सी सारख्या सामग्रीपासून तयार करण्यात आला आहे.

20 नोव्हेबर 1998 पासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची उभारणी सुरू करण्यात आली. कसरतीचे काम म्हणजे त्याचा एक-एक भाग अंतराळात नेऊन तिथे या स्पेस स्टेशनला आकार देण्यात आला. 2 नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अंतराळात स्थापन झाल्याच्या घटनेला 23 वर्षे पूर्ण झाली. 4.5 लाख किलो वजनाचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून 400 कि.मी. उंचीवर हवेत तरंगत आहे.

Back to top button