राहुल गांधी यांनी घेतले केदारनाथाचे दर्शन | पुढारी

राहुल गांधी यांनी घेतले केदारनाथाचे दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी आज केदारनाथ धाममध्ये पोहोचले. दुपारी त्‍यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. राहुल गांधी उत्तराखंडच्‍या तीन दिवसांच्‍या दौर्‍यावर आहेत.

काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ येथे राहुल यांची वैयक्तिक भेट आहे. येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी यांनी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मंदिराच्या महंत पुजाऱ्यांची भेट घेतली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाने देशाच्या विविध भागात नुकत्याच केलेल्या अचानक भेटींच्या धर्तीवर त्यांचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे राज्य संघटनेलाही कार्यक्रमाची माहिती अनौपचारिकपणे मिळू शकली. मात्र, या दौऱ्यात माजी प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल उपस्थित राहणार आहेत.

Back to top button