Israel-Hamas war : जगाला धडकी भरवणारा पर्याय..! इस्‍त्रायलचे मंत्री म्‍हणाले, “गाझावर अणुबॉम्‍ब …” | पुढारी

Israel-Hamas war : जगाला धडकी भरवणारा पर्याय..! इस्‍त्रायलचे मंत्री म्‍हणाले, "गाझावर अणुबॉम्‍ब ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रायल-हमास युद्ध आता भयावह वळणावर पोहचल्‍याचे स्‍पष्‍ट हाेत आहे. कारण युद्धात कोणते पर्याय आहेत, या प्रश्‍नावर इस्रायली मंत्री (Israeli Minister) अमिहाई एलियाहू यांनी दिलेल्‍या उत्तरात जगाला धडकी भरवणारा पर्याय सांगितला आहे. इस्रायलने हल्ला तीव्र करत असताना गाझावर अणुबॉम्ब टाकणार का, असा सवाल मंत्री एलियाहू यांना विचारण्‍यात आला हाेता. यावर असता ते म्‍हणाले की, “गाझावर अण्वस्त्र सोडणे हा या युद्धातील एक पर्याय असू शकतो.”

इस्रायलचा गाझा येथील अल-अजहर विद्यापीठावर हवाई हल्ला

इस्रायलने गाझा येथील अल-अजहर विद्यापीठावर हवाई हल्ला केला आहे. पॅलेस्टाईनचे उप परराष्ट्र मंत्री अमल जदौ यांनी सांगितले की, इस्रायलने गाझा येथील अल-अजहर विद्यापीठावर बॉम्बहल्ला केला आहे, असे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले आहे. मंत्र्यांनी बॉम्बस्फोटाचा व्हिडिओही शेअर केला आहे. जादुओने शनिवारी रात्री X वर केलेल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “इस्रायली हल्ल्यांमध्ये रुग्णवाहिका, 3 रुग्णालये आणि 5 आश्रयस्थानांना लक्ष्‍य बनवले.  या हल्‍ल्‍यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला.”

दरम्‍यान, मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन रविवारी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेणार आहेत. ही बैठक वेस्ट बँक येथे होणार आहे.

हमासने केले ते भयंकरच; पण पॅलेस्टिनी लोकांवरील हल्‍ले ‘असह्य’ करणारे : ओबामा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्‍त्रायल-हमास युद्धावर आपलं मत व्‍यक्‍त केले आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याचा संदर्भ देत, ते म्‍हणाले की, हमासने इस्‍त्रायलमध्‍ये केले ते भयंकर कृत्य होते. त्याचे कोणतेही समर्थन नाही. मात्र पॅलेस्टिनी लोकांवरील हल्‍ले असह्य करणारे आहेत.”

 

Back to top button