Terrorist Arrested : इसिस पुणे मॉड्यूलप्रकरणी आणखी एका दहशतवाद्यास अटक | पुढारी

Terrorist Arrested : इसिस पुणे मॉड्यूलप्रकरणी आणखी एका दहशतवाद्यास अटक

महेंद्र कांबळे

पुणे : इसिस पुणे मॉड्यूलप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. महंमद शाहनवाज आलम (वय 31, मूळ झारखंड), असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता. आलम याचा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग आढळून आला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) शोध घेत असलेल्या महंमद युनूस महंमद याकू साकी (वय 24) आणि महंमद इम—ान महंमद युसूफ खान (वय 23) यांना कोथरूड पोलिसांनी जुलै महिन्यात अटक केली. त्यांचा साथीदार आलम पसार झाला होता. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. लपण्याचे ठिकाण शोधण्यात, शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता.

पुणे पोलिस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दहशतवाद्यांना अटक करून मइस्लामिक स्टेटफचे (इसिस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. साकी आणि खान यांनी पुणे आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट केले होते. या दोघांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादिर दस्तगीर पठाण आणि आर्थिक मदत करणारा मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरूद्दीन काझी यांना मएटीएसफने अटक केली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांत घातपाताचा कट आखला होता.

संबंधित बातम्या

मएनआयएफने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनान सरकार याला कोंढव्यातून अटक केली. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शर्जिल शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली. तरुणांची माथी भडकवून त्यांना मआयएसफमध्ये भरती करून घेण्याचे महाराष्ट्र मॉड्यूल दहशतवाद्यांनी आखले होते. या दहशतवाद्यांच्या सूचनेनुसार साकी आणि खान घातपाताचा कट आखत होते.

हेही वाचा

राज्यात प्रादेशिक पाणीसंघर्ष उफाळण्याची चिन्हे!

Israel-Hamas War : इस्रायलला हादरवणारा पॅलेस्टिनी दहशतवादी मोहम्मद डीफ

सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या; सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन : मनोज जरांगे-पाटील

Back to top button