करवीर निवासिनी अंबाबाई किरणोत्सव : दुसर्‍या दिवशीही किरणे देवीच्या कमरेपर्यंत | पुढारी

करवीर निवासिनी अंबाबाई किरणोत्सव : दुसर्‍या दिवशीही किरणे देवीच्या कमरेपर्यंत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी (बुधवार) सायंकाळी सूर्यकिरणे पहिल्या दिवसाप्रमाणेच देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. सूर्य मावळतीला जात असताना ढगांमुळे अडथळा निर्माण झाल्याने किरणांची तीव—ता कमी झाली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने भाविकांसाठी मंदिराच्या दक्षिण दरवाजाबरोबरच छत्रपती शिवाजी चौक व मिरजकर तिकटी येथे एलईडी स्क्रीन उभारण्यात आले असून, यावरून किरणोत्सवाचा लाभ लोकांनी आवर्जून घेतला. सायंकाळी 4 वाजून 47 मिनिटांनी सूर्यकिरणे महाद्वारात आली. सायंकाळी 5 वाजल्यापासून पुढची 15 मिनिटे किरणे गरुड मंडपात राहिली. 5 वाजून 34 मिनिटांनी पितळी उंबरा, संगमरवरी पायरी असा प्रवास करून 5 वाजून 46 मिनिटांनी किरणे देवीच्या चरणापर्यंत पोहोचली. 5 वाजून 48 मिनिटांनी मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचलेली सूर्यकिरणे डावीकडे लुप्त झाली.

यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर, व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते.

Back to top button