पिंपरी : बांधकाम परवानगी विभागाच्या उत्पन्नात मोठी घट | पुढारी

पिंपरी : बांधकाम परवानगी विभागाच्या उत्पन्नात मोठी घट

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बांधकाम परवानगी विभागाचे उत्पन्न यंदा घटले आहे. एक एप्रिल ते 30 सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ 292 कोटी 46 लाख रुपयांचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही रक्कम तब्बल 68 कोटींनी कमी आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे गृहप्रकल्पातील सदनिकांना मोठी मागणी आहे. सदनिकांची विक्रीही वाढली आहे. शहरात विशेषत: उपनगरात टोलेजंग इमारतींचे गृह व व्यापारी प्रकल्प उभे राहत आहेत. कोरोना महामारीनंतर बांधकाम क्षेत्र सावरले. या क्षेत्रात मोठ्या वेगात तेजी आली. शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊ लागल्याने सन 2021-22 या आर्थिक वर्षात विक्रमी 1 हजार 30 कोटी 68 लाखांचे उत्पन्न बांधकाम परवानगी विभागास मिळाले.
सन 2021-22 या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या. त्यामुळे त्यांच्या पुढील सन 2022-23 आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीचे प्रमाण काहीसे घटले. त्या वर्षी एकूण 722 कोटींचा महसूल बांधकाम परवानगी विभागास मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 308 कोटी रुपयांनी घटले.
तर, सध्या चालू असलेल्या सन 2023-24 या आर्थिक वर्षांतील 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2023 या सहा महिन्यात बांधकाम परवानगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मागील दोन वर्षाची तुलना करता हे प्रमाण खूपच अल्प आहे. सहा महिन्यांत बांधकाम परवानगी विभागास केवळ 292 कोटी 46 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यावरून शहरात नवे गृह व व्यापारी प्रकल्प उभारण्याची संख्या घटली आहे.

नवीन नियमामुळे बांधकाम परवानगीचे प्रमाण कमी

गृहप्रकल्पास बांधकाम परवानगी घेताना संबंधित बांधकाम व्यावसायिकास एकूण प्रकल्पाच्या जागेपैकी 5 टक्के जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेस देण्याची नवी अट आहे. त्या जागेत महापालिका दवाखाना, भाजी मंडई, सांस्कृतिक केंद्र असे सार्वजनिक सुविधा निर्माण करते. तसेच, अ‍ॅमिनिटी स्पेससाठी 5 टक्के जागा सोडण्याचे बंधन आहे. त्यामुळे तब्बल 10 टक्के जागेत गृहप्रकल्पाचे बांधकाम करता येत नाही. जमिनीचे दर सोन्यापेक्षा अधिक आहेत.

वर्षाच्या अखेरीस परवानगीची संख्या वाढते

शहरात बांधकाम परवानगीचे प्रमाण समाधानकारक आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत 292 कोटी 46 लाखांपर्यंत झाले आहे. आर्थिक वर्षांत शेवटच्या टप्पात सर्वांधिक फाईली बांधकाम परवानगीसाठी येतात. त्यामुळे गेल्या वर्षीइतके उत्पन्न मिळेल, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

बांधकाम परवानगी विभागास  मिळालेले उत्पन्न

आर्थिक वर्ष उत्पन्न
2018-19 508 कोटी 46 लाख
2019-20 651 कोटी 99 लाख
2020-21 379 कोटी 58 लाख
2021-22 1,030 कोटी
68 लाख
2022-23 722 कोटी
30 सप्टेंबर 2023 292 कोटी 46 लाख
पर्यंत

नवीन नियमामुळे बांधकाम परवानगीचे प्रमाण कमी

गृहप्रकल्पास बांधकाम परवानगी घेताना संबंधित बांधकाम व्यावसायिकास एकूण प्रकल्पाच्या जागेपैकी 5 टक्के जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेस देण्याची नवी अट आहे. त्या जागेत महापालिका दवाखाना, भाजी मंडई, सांस्कृतिक केंद्र असे सार्वजनिक सुविधा निर्माण करते. तसेच, अ‍ॅमिनिटी स्पेससाठी 5 टक्के जागा सोडण्याचे बंधन आहे. त्यामुळे तब्बल 10 टक्के जागेत गृहप्रकल्पाचे बांधकाम करता येत नाही. जमिनीचे दर सोन्यापेक्षा अधिक आहेत.

वर्षाच्या अखेरीस परवानगीची संख्या वाढते

शहरात बांधकाम परवानगीचे प्रमाण समाधानकारक आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत 292 कोटी 46 लाखांपर्यंत झाले आहे. आर्थिक वर्षांत शेवटच्या टप्पात सर्वांधिक फाईली बांधकाम परवानगीसाठी येतात. त्यामुळे गेल्या वर्षीइतके उत्पन्न मिळेल, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
हेही वाचा

Back to top button