Sharad Pawar : सरकारच्या कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : सरकारच्या कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत सरकार गंभीर नाही आहे. असं म्हणतं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ते  वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माध्य़मांशी संवाद साधत होते.  (Sharad Pawar )

वाय. बी. चव्हाण. सेंटरवर माध्य़मांशी बोलत असताना शरद पवार यांनी, “राज्यात कंत्राटी भरतीला आमचा विरोध आहे. कंत्राटी भरती ऐवजी कायम स्वरुपी भरती करण्यात यावी. कंत्राटी भरती विरोधात विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. कंत्राटी भरतीत आरक्षण मिळणार नाही त्यामुळे विविध घटकांवर अन्याय होईल. पोलीस भरती अकरा महिन्यासाठी. ही कंत्राटी भरती. मग अकरा महिन्यानंतर ही मुले काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलत असताना ते म्हणाले की,”काही शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला. शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला याने शिक्षणाच्या दर्जा वर परिणाम होईल. शिक्षक संघटनांच्या या निर्णयाला विरोध आहे.

हेही  वाचा 

Back to top button