जातीनिहाय जनगणना घेण्याचा काँग्रेसचा निर्णय : नाना पटोले | पुढारी

जातीनिहाय जनगणना घेण्याचा काँग्रेसचा निर्णय : नाना पटोले

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा :  आरक्षणाच्या प्रश्नावरून आता दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. जातीनिहाय जनगणनेनंतर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उंचावेल. जातिनिहाय जनगणना घेणे घटनात्मक असल्यामुळे काँग्रेस या निर्णयावर ठाम आहे. महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करणे हीच आमची भूमिका असल्याचे मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, पक्षाच्या वतीने राज्यभरात विभागनिहाय संघटनात्मक पक्षबांधणीच्या आढावा बैठका घेतल्या जात आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विभागाच्या बैठकांनंतर मराठवाडा विभागाची बैठक पार पडली.

2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2011 मध्ये झालेली जनगणना केंद्र सरकार जाहीर करत नाही. जातिनिहाय जनगणना केल्यावरच आरणक्षाचा तिढा सुटणार आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून इंडियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही. याबाबत प्रस्ताव आल्यानंतर आघाडीतील सर्व घटक पक्ष निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

Back to top button