भारत-रशियामध्ये तेढ निर्माण करू नये : व्लादिमीर पुतीन | पुढारी

भारत-रशियामध्ये तेढ निर्माण करू नये : व्लादिमीर पुतीन

मॉस्को, वृत्तसंस्था : भारत आणि रशियामध्ये पाश्चिमात्य देशांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. काळ्या समुद्रानजीक (ब्लॅक) असलेल्या सोची शहरातील एका कार्यक्रमात पुतीन बोलत होते. ते म्हणाले की, भारत हा एक स्वतंत्र देश असून तेथील सरकार नागरिकांच्या हितासाठी काम करते, त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी निरर्थक प्रयत्न करू नयेत. आपल्या अधिपत्याखाली नसलेल्या प्रत्येक देशासाठी शत्रू निर्माण करण्याचे काम पाश्चिमात्य देशांकडून सातत्याने केले आहे.

भारत सरकार देशवासीयांच्या हितासाठी काम करत आहे. भारतीय तेल कंपन्या रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदी करत असताना भारताच्या या धोरणावर पाश्चिमात्य देशांकडून टीका केली जात आहे, अशाच वेळी पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना दम दिला आहे.

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देश आणि युरोपीय संघाने रशियावर अनेक निर्बंध घातले. रशियाकडून तेल खरेदी न करणे हा त्याच धोरणातील एक भाग आहे.

Back to top button