गोरेगाव आगीतील मृतांना २ लाख तर जखमींना ५० हजार, पीएम मोदींची माहिती | पुढारी

गोरेगाव आगीतील मृतांना २ लाख तर जखमींना ५० हजार, पीएम मोदींची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील गोरेगाव आगीतील मृतांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पीएम मोदी यांनी दिली आहे. तसे ट्विट एक्सवर (ट्विटर) करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या – 

‘मुंबईतील गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती सांत्वना. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधींतर्गत प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपये दिले जातील. जखमींना रु. ५० हजार रुपये दिले जातील,’ अशी माहिती पीएमओ एक्सवरून देण्यात आली आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जखमी झालेल्यांपैकी ३९ जणांना एचबीटी आणि कपूर रूग्‍णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्‍यान, अग्‍निशमन दल आणि पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Back to top button