Asian Games Table Tennis : टेबल टेनिसमध्‍ये भारताचा चीनला धक्‍का, उपांत्‍य फेरीत धडक | पुढारी

Asian Games Table Tennis : टेबल टेनिसमध्‍ये भारताचा चीनला धक्‍का, उपांत्‍य फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशियाई क्रीडा स्‍पर्धेत आज टेबल टेनिसमधील महिला दुहेरीत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. त्‍यांनी चीनच्‍या जोडीचा पराभव करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.  त्‍याच्‍या या जबरदस्‍त कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्‍ये महिला दुहेरीत भारतासाठी पदक निश्चित झाले आहे. ( Asian Games Table Tennis )

टेबल टेनिस खेळात चीनचा माेठा दबदबा आहे. उपांत्‍यपूर्व फेरीत भारताच्‍या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या  चीनची  जोडी वांग यिदी आणि चेन मेंग यांचा ११-५, ११-५, ५-११, ११-९ असा पराभव केला.

पहिल्‍या दोन गेम जिंकत भारताने या सामन्‍यावर आपली पकड मजबूत केली. मात्र चीनने पुन्‍हा कमबॅक करत एक गेम जिंकला. यानंतर चौथ्‍या गेममध्‍ये अहिका आणि सुतीर्थ यांनी उत्‍कृष्‍ट टेबल टेनिसचे प्रदर्शन करत चीनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. त्‍याच्‍या या जबरदस्‍त कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्‍ये महिला दुहेरीत भारतासाठी पदक निश्चित झाले आहे.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button