Asian Games 2023: एशियन गेम्समध्ये कोल्हापूरचा डंका; राधानगरीतील स्वप्निल ठरला ‘गोल्डन बॉय’ | पुढारी

Asian Games 2023: एशियन गेम्समध्ये कोल्हापूरचा डंका; राधानगरीतील स्वप्निल ठरला 'गोल्डन बॉय'

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये (Asian Games 2023) शुटिंग मधील ५० मीटर थ्री पोझिशन या प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, अखिलेश वरण यांच्यासोबत भारताला सांघिक सुवर्णपदक पटकावून दिले. या स्पर्धेतील हे भारताचे सातवे सुवर्णपदक आहे. या सांघिक यशानंतर राधानगरी तालुक्यामध्ये फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावच्या स्वप्निल यांने ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि अखिलेशवरण यांच्यासोबत आज (दि.२९) झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये ५५१ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. (Asian Games 2023)

या स्पर्धेत तिघांनी १७६९ गुणांची कमाई करत वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केले. स्वप्निलने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदके पटकावत दर्जेदार कामगिरी केली आहे. पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठीही तो पात्र ठरला आहे. प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे. सेंट्रल रेल्वे मध्ये तो नोकरी करत आहे. भोसला मिलिटरी स्कूलचा तो विद्यार्थी आहे. त्याने आतापर्यंत अनेक सुवर्णपदके मिळवत कोल्हापूर जिल्ह्याचा यशाचा झेंडा अटकेपार फडकविला आहे.

हेही वाचा 

Back to top button