Asian Games 2023 | भारताचा आठवा सुवर्णवेध! १० मीटर पिस्तूल प्रकारात पलकला सुवर्ण, ईशा सिंगला रौप्यपदक | पुढारी

Asian Games 2023 | भारताचा आठवा सुवर्णवेध! १० मीटर पिस्तूल प्रकारात पलकला सुवर्ण, ईशा सिंगला रौप्यपदक

पुढारी ऑनलाईन : नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत १७ वर्षीय पलक पलक गुलियाला सुवर्णपदक आणि १८ वर्षीय ईशा सिंगला रौप्यपदक मिळाले. सुवर्णपदक विजेत्या पलकने आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम रचला. दरम्यान, ईशा सिंगचे हे चौथे पदक आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताने सुवर्ण आणि रौप्य जिंकले. तर पाकिस्तानच्या किश्माला तलतने कास्यंपदक मिळाले. आतापर्यंत भारताने ८ सुवर्ण, ११ रौप्य आणि ११ कास्यंपदके जिंकली आहेत.

संबंधित बातम्या

पलकचा २४२.१ आणि ईशाचा २३९.७ स्कोअर राहिला. पलकने आशियाई क्रीडा स्पर्धेतही विक्रम केला.

दरम्यान, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, स्वप्नील कुसाळे, अखिल शेओरन यांनी पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३P सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात त्यांनी जागतिक विक्रम मोडला. तत्पूर्वी, इशा, पलक आणि दिव्या थडीगोल यांनी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताला दिवसातील पहिले पदक जिंकून दिले होते.

asian games 2023 medal tally

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारताने नेमबाजीत १७ पदके मिळवली आहेत.

चीनमधील हँगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांना टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत ४-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामना १ तास १२ मिनिटे चालला.

 हे ही वाचा :

Back to top button