Stock Market Closing Bell | बाजारात तेजी परतली! दिवसाच्या निचांकावरून सेन्सेक्स ५७० अंकांनी सावरला | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजारात तेजी परतली! दिवसाच्या निचांकावरून सेन्सेक्स ५७० अंकांनी सावरला

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान आज भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स १७३ अंकांनी वाढून ६६,११८ वर बंद झाला. तर निफ्टी ५१ अंकांच्या वाढीसह १९,७१६ वर स्थिरावला. सेन्सेक्स (Sensex Today) आज ६५,९२५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,५४९ पर्यंत खाली आला होता. पण बंद होताना तो ६६,११८ वर गेला. याचाच अर्थ आज दिवसाच्या निचांकावरून सेन्सेक्स सुमारे ५७० अंकांनी सावरला.

दरम्यान, क्षेत्रीयमध्ये पीएसयू बँक, कॅपिटल गुड, एफएमसीजी, रियल्टी आणि हेल्थकेअर निर्देशांक ०.५-१ टक्क्यांनी वाढले, तर ऑईल आणि गॅस सेक्टरमध्ये काही प्रमाणात विक्री दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.६ टक्क्यांनी वाढला.

सुरुवातीच्या घसरणीनंतर आजच्या ट्रेडिंग सत्राच्या उत्तरार्धात खरेदी झाल्यामुळे शेअर बाजार रिकव्हरी मोडवर आला. या रिकव्हरीत फार्मा आणि आयटी स्टॉक्समधील खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर एलटीचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर २.१५ टक्के वाढून २,९७५ रुपयांवर पोहोचला. आयटीसी, सन फार्मा, रिलायन्स, मारुती हे शेअर्स १ ते १.७२ टक्क्यांपर्यंत वाढले. ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्सनीदेखील हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर टायटन, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, एसबीआय हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० वर एलटी, सिप्ला, आयटीसी, कोल इंडिया, LTI Mindtree हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर टायटन, ग्रासीम, बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्प हे घसरले.

NSE वरील उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २६ सप्टेंबर रोजी ६९३.४७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ७१४.७५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Closing Bell)

अमेरिकेतील बाजारात मोठी घसरण

आशियाई बाजारांत आज संमिश्र व्यवहार झाले. सेऊल आणि टोकियो येथील शेअर बाजारात नकारात्मक परिस्थिती राहिली. तर शांघाय आणि हाँगकाँग येथील निर्देशांक तेजीत राहिले. अमेरिकेतील शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली होती. डाऊ जोन्स, एस अँड पी (S&P 500) आणि नॅस्‍डॅक (Nasdaq Composite) हे निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरले. डाऊ जोन्स १.१४ टक्क्यांनी म्हणजे ३८८ अंकांनी घसरून ३३,६१८ वर बंद झाला. नॅस्डॅक १.५७ टक्क्यांनी घसरून १३,०६३ वर बंद झाला. ॲपलचे शेअर्स २.३ टक्क्यांनी तर मायक्रोसॉफ्टचे शेअर्स १.७० टक्क्यांनी घसरले. फेडरल रिझर्व्हकडून उच्च व्याजदर कायम राहणार असल्याचे संकेत आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याच्या चिंतेने बाजारात घसरण होत आहे. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात दिसून आले.

जागतिक बाजारात दबाव, कारण काय?

चीनमधील आर्थिक संकट, यूएस ट्रेझरीचे वाढते उत्पन्न आणि जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यासारख्या कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत अलीकडील काही दबाव निर्माण झाला आहे. गुंतवणूकदार दीर्घकाळापर्यंत जागतिक व्याजदर वाढीच्या संभाव्यतेबद्दल आणि तेलाच्या उच्च किमतींच्या परिणामाबद्दल चिंतित आहेत. याचे अमेरिकेसह आशियाई बाजारात परिणाम दिसून येत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button