F&O मध्ये मध्यरात्रीपर्यंत करू शकाल ट्रेडिंग! काय आहे NSE ची योजना | पुढारी

F&O मध्ये मध्यरात्रीपर्यंत करू शकाल ट्रेडिंग! काय आहे NSE ची योजना

पुढारी ऑनलाईन : भारतातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजपैकी एक असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ची आता इक्विटी डेरिव्हेटिव्हसाठी ट्रेडिंगचा वेळ वाढवण्याच्या तयारी आहे. जर ट्रेडिंगचे तास वाढले तर F&O चे गुंतवणूकदार अधिक वेळ ट्रेडिंग करु शकणार आहेत. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

 संबंधित बातम्या

काय असेल वाढीव वेळ

या वृत्तानुसार, NSE संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंतच्या ट्रेडिंग सत्रावर विचार करत आहे जिथे बाजारातील गुंतवणूदार ९:१५ ते दुपारी ३:३० या नियमित ट्रेडिंग तासांनंतर फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्सचा व्यवहार करू शकतील. NSE हे ट्रेडिंग सत्र रात्री ११:३० पर्यंत वाढवू शकते, असे सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात सूचित करण्यात आले आहे.

ट्रेडिंगची वेळ वाढवण्याचा उद्देश हा आहे की स्थानिक गुंतवणूकदारांना जागतिक बाजारातील हालचालीवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी संधी देणे. सध्या अमेरिकेतील शेअर बाजार खुला होण्यापूर्वी भारतीय शेअर बाजार बंद होतात.

मंजुरीची प्रतीक्षा

ट्रेडिंगचे तास वाढविण्याबाबत NSE ने आधीच त्यांचा प्रस्ताव बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. सेबीने आधीच नियम बनवले आहेत; ज्यामुळे एक्सचेंजेसला फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंग रात्री ११:५५ पर्यंत आणि शेअर्स संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालू ठेवता येतील.

NSE या वर्षाच्या सुरुवातीपासून ट्रेडिंग तासांच्या विस्तारावर विचार करत होते. कदाचित विस्तारित ट्रेडिंग तासांमध्ये प्रॉडक्ट्सचा टप्प्याटप्प्याने परिचय करून देईल. निफ्टी आणि बँक निफ्टीसह इंडेक्स फ्युचर्स आणि पर्यायांसह सुरुवात करण्याचा आणि नंतर स्टॉक डेरिव्हेटिव्ह्जचा समावेश करण्याचा एनएसईचा विचार आहे.

 हे ही वाचा :

 

Back to top button