Disease X आहे कोरोनापेक्षाही २० पटीने जीवघेणा; ५ कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू, तज्ज्ञांचा इशारा | पुढारी

Disease X आहे कोरोनापेक्षाही २० पटीने जीवघेणा; ५ कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू, तज्ज्ञांचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जग कोरोना महामारीच्या साथीतून बाहेर पडले असतानाच तज्ज्ञांनी आता नवीन रोग येण्याची भीती व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील आरोग्य विभाग आता “डिसीज एक्स” (Disease X) म्हणून ओळखल्या जाणार्‍या संभाव्य नवीन साथीच्या रोगाच्या नियंत्रणाची तयारी करत आहे. या नवीन विषाणूचा १९१८-२० च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखाच परिणाम होऊ शकतो. ‘डिसीज एक्स’ हा कोरोनापेक्षा २० पट भयंकर असू शकतो, तसेच या महामारीत किमान ५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

संबंधित बातम्या : 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) “Disease X” बद्दल अलर्ट दिला आहे. या संभाव्य नवीन साथीच्या रोगामुळे कोरोना पेक्षा २० पट अधिक मृत्यू होण्याची शक्तता आहे. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत, ब्रिटनच्या लसीकरण टास्कफोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी Disease X हा COVID-19 पेक्षा खूपच धोकादायक असण्याची शक्यता वर्तवली आहे. या रोगामुळे ५ कोटी मृत्यू होऊ शकतात. १९१८-१९ च्या फ्लू महामारीने जगभरात किमान ५ कोटी लोकांचा बळी घेतला होता जो पहिल्या महायुद्धात मारले गेलेल्यापेक्षा दुप्पट होता, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या वैज्ञानिक २५ वेगवेगळ्या विषाणू गटांची माहिती गोळा करत आहेत, ज्यात हजारो विषाणू आहेत. हा विषाणू म्यूटेट होऊन महामारीत रूपांतरित होण्याची भीती आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये प्राण्यांपासून माणसांमध्ये येऊ शकतात असे विषाणूंचा समावेश नाही.

लस तयार करण्यास सुरूवात

एक्स रोगाविरुद्ध सध्या मान्यताप्राप्त लसी उपलब्ध नाहीत. मात्र ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी या रोगाविरुद्ध लस तयार करण्याचे काम सुरू केल्याचे वृत्त आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (यूकेएचएसए) चे प्रमुख प्रोफेसर डेम जेनी हॅरी म्हणाले की, हवामान बदलासारखे अनेक घटक भविष्यातील साथीच्या रोगांची शक्यता वाढवत आहेत. या प्रकरणी पूर्वतयारी म्हणून सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button