मुंबई : धावत्या लोकलमध्ये बेली डान्स परफॉर्मन्स | पुढारी

मुंबई : धावत्या लोकलमध्ये बेली डान्स परफॉर्मन्स

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : धावत्या लोकलमध्ये बेली डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर काही प्रवाशांनी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकल पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला धावत्या लोकलमध्ये बेली डान्स करत आहे. लोकल मधील व्हायरल होणारे व्हिडिओ काही नवीन नसले तरी, या विशिष्ट घटनेने सांस्कृतिक धारणा, सार्वजनिक वर्तन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चोख राखण्यात अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण करणारी आहेत.

काही प्रवासी या व्हिडीओला निरुपद्रवी मनोरंजन म्हणून तर काहीजण याला तीव्र विरोध कर कलाकारावर योग्य कारवाईची मागणी करत आहेत. परंतु या घटनेची नेमकी तारिख आणि ठिकाण माहित नाही. परंतु रेल्वे आणि लोहमार्ग पोलिसांमधील काही सुत्रांच्या मतानुसार हा व्हिडीओ सीएसएमटी ते सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यानचा आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button