पिंपरी : ‘महापालिका कारभार गतिमान करण्याचे अधिकार्‍यांना निर्देश’ | पुढारी

पिंपरी : ‘महापालिका कारभार गतिमान करण्याचे अधिकार्‍यांना निर्देश’

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा राबविण्यात येत आहे. त्यासाठी गतिमान कामकाज करावे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभतेने माहिती पोहोचवावी. अधिकारी व कर्मचार्‍यांनी पूर्ण
क्षमतेने सकारात्मक कामकाज करावे, असे निर्देश सर्व विभागप्रमुख व अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या संदर्भात सोमवारी (दि.18) झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, आमदार उमा खापरे, सहशहर अभियंता
रामदास तांबे, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते.

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले की, राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियानाचा कालावधी 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर आहे. महापालिका गटात प्रथम क्रमांकासाठी 10 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 6 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 4 लाख रुपयांच्या बक्षीस आहे. महापालिकेमार्फत करण्यात येणार्‍या योजनांचा कृती आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

हेही वाचा

Karnataka Politics : कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्रिपदे !

पिंपरी शहरातील लेबर कॅम्प गुन्हेगारांसाठी सुरक्षित अड्डे

नगर झेडपीच्या रिक्त जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा

Back to top button