Nashik Accident : गणेशमूर्ती घेऊन जाताना घडला अपघात, 6 जण जखमी | पुढारी

Nashik Accident : गणेशमूर्ती घेऊन जाताना घडला अपघात, 6 जण जखमी

मनमाड (प्रतिनिधी) : पुढारी वृत्तसेवा

भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने रिक्षा आणि दोन दुचाकीना जोरदार धडक दिल्याची घटना शहरापासून जवळ बुरकूल वाडी जवळ घडली. तीन वाहनाच्या या विचित्र अपघातात 6 जण जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी तिन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. (Nashik Accident)

गणेश मूर्ती घेऊन कार ने पानेवाडीकडे जात असताना बुरकूलवाडी जवळ कुत्रा आडवा आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या नादात कार चालकाचा नियंत्रण सुटलं आणि त्याने एक रिक्षा आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा मधील प्रवासी, दोन्ही दुचाकीस्वार आणि कार मधील असें 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

हेही वाचा :

Back to top button