अफगाणिस्तानला भेट द्या, मजेशीर व्हिडीओ व्हायरल | पुढारी

अफगाणिस्तानला भेट द्या, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

काबूल : तालिबान म्हटले की, अंगावर शहारा येतो. याचे कारण म्हणजे तेथील भयावह शासनव्यवस्था. या पार्श्वभूमीवर, एका पॅरोडी अकाऊंटवरून जगभरातील पर्यटकांना अफगाणिस्तानला भेट देण्याचे आमंत्रण देणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या मजेशीर व्हिडीओत म्हटले आहे की, तुम्ही सुरक्षित राहाल याची शंभर टक्के हमी आम्ही देतो. तुम्हाला तालिबानी सैनिक ताब्यात घेणार नाहीत किंवा कसलीही खंडणी मागणार नाहीत. अमेरिकेपेक्षा मुक्त वातावरण अफगाणिस्तानमध्ये असून, हा देश म्हणजे वीरांची भूमी असल्याची मल्लिनाथी त्यात करण्यात आली आहे. युजर्सनी इंटरनेटवर या व्हिडीओबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी म्हटले आहे, जर हे खरे असेल तर या देशाबद्दल जाणून घेणे मला नक्कीच आवडेल. अन्य युजर्सनी अफगाणिस्तानपासून दोन हात दूर राहणेच उत्तम असे म्हटले आहे. अंतर्गत यादवीने गांजलेल्या या देशात अनेक सौंदर्यस्थळे असली तरी जगभरातील पर्यटकांनी अफगाणिस्तानपासून लांबच राहाणे पसंत केले आहे.

Back to top button