रायगड : रोहा-नागोठणे मार्गावर वाहतूक कोंडी; २ कि.मी पर्यंत वाहनांच्या रांगा | पुढारी

रायगड : रोहा-नागोठणे मार्गावर वाहतूक कोंडी; २ कि.मी पर्यंत वाहनांच्या रांगा

रोहे; महादेव सरसंबे रोहा नागोठणे मार्गावर वाहतूक कोंडी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या २ ते ३ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आपल्या गावी येत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग गणेश भक्तांसाठी रहदारीचा मार्ग असला, तरी वाकण व खांब याला पर्यायी मार्ग म्हणून असलेल्या वाकण भिसेखिंड रोहा कोलाड या मार्गावर काही प्रमाणात वाहतूक होत असते.

यासह रोहा मुरुड तळा या गावाकडे व तालुक्याकडे जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहन घेऊन आपल्या गावी येत असतात. आज सकाळपासूनच या पर्यायी मार्गाचा नागरिकांनी अवलंबन केला होता. परंतु मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने रोहा शहर ते पडम खरापटी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर असून, धीम्या गतीने ही वाहने मार्गक्रमण करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button