‘Gadar 2’ ने ‘बाहुबली २’चा लाईफ टाईम कलेक्शनचा आकडा केला पार | पुढारी

'Gadar 2' ने 'बाहुबली २'चा लाईफ टाईम कलेक्शनचा आकडा केला पार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’ ( Gadar 2) ची बॉक्स ऑफिसवर घौडदौड कायम आहे. ‘गदर २’ आता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला टक्कर देत आहे. मात्र, तो येवढ्यावरच न थांबता आता ‘गदर २’ ने एसएस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर ‘बाहुबली २’ चाही लाईफ टाईम कलेक्शनचा आकडा पार केला आहे.

दिग्दर्शक आणि समीक्षक तरूण आदर्श यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) ‘गदर २’ (Gadar 2) च्या कलेक्शनचे आकडे सांगितले आहेत. यात ‘गदर २’ ने पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १३४. ४७ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ६३. ३५ कोटी, चौथ्या आठवड्यात २७.५५ कोटी आणि पाचव्या आठवड्यात ५. ३ कोटी अशी एकूण मिळून ५१५. १३ कोटींची कमाई केली आहे.

अवघ्या ३० दिवसांत या चित्रपटाने भरघोस अशी कामगिरी केली असून ‘जवान’ आणि ‘बाहुबली २’ चा विक्रम मोडीत काढला आहे. यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button