

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून त्याची कमाई थांबण्याचे नाव घेत नाही. सनी देओलची सावत्र बहीण ईशा देओलने हा चित्रपट पाहिला. तर आता हेमा मालिनीने हा चित्रपट पाहिला आहे. यावर तिनेही प्रतिक्रिया देत कौतुक केले.
हेमा मालिनी गदर 2 पाहिल्यानंतर तिची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ती सनी देओलचे कौतुक करताना यामध्ये दिसत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर ती खूप आनंदी दिसत होती. चित्रपटगृहातून बाहेर पडताना त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले. माध्यमांशी संवाद साधताना हेमा मालिनी म्हणाल्या, हा चित्रपट पाहून खूप छान वाटले. ७० आणि ८० च्या दशकातल्या युगासारखं वाटत होतं. असा हा चित्रपट आहे. ते युग आणले आहे. अनिल शर्मा जी यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. याशिवाय सनीही शानदार भूमिका पार पाडली आहे.
चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, रिलीजच्या 10 दिवसांतच 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही मोठी गोष्ट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2001 मध्ये आला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आला असून चाहते या चित्रपटाच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले आहेत. चित्रपटातील काही गाणी रिपीट झाली आहेत ज्यामुळे चित्रपटाची आभा वाढली आहे. येत्या आठवड्यातही हा चित्रपट अजून जास्त कमाई करत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
-हेही वाचा