Afghanistan Earthquake | अफगाणिस्तानमधील फैजाबादमध्ये दोनवेळा भूकंपाचे धक्के | पुढारी

Afghanistan Earthquake | अफगाणिस्तानमधील फैजाबादमध्ये दोनवेळा भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगानिस्तानमधील फैजाबादमध्ये सोमवारी (दि.४ सप्टेंबर) सकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या ठिकाणी ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू फैजाबाद शहराच्या आग्नेयला १९६ किमी अंतरावर १५८ किमी खोलीवर केंद्रबिंदू होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

याआधी आज पहाटेही ३ वाजताच्या सुमारास देखील अफगाणिस्तानातील फैजाबाद शहरात ४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू फैजाबाद शहरापासून आग्रेयला १४१ किमी अंतरावर १० किमी खोलीवर असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने  ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत माहिती दिली आहे. पहाटेपासून सलग दोन सौम्य भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानातील फैजाबाद शहरात जाणवले आहेत.

Afghanistan Earthquake: ऑगस्ट महिन्यात दहा दिवसांत दोनदा भूकंपाचे धक्के

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानात दहा दिवसांत दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते.१८ ऑगस्टला ४.५ रिश्टर स्केलचा पहिला भूकंप जाणवला होता. अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून पश्चिमेला सुमारे ४२३ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले होते, याचा केंद्रबिदू १०० किलोमीटर खोलीवर होता. याच महिन्यात २८ ऑगस्टला सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी आफगाणिस्तानमध्ये ४.८ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू १७३ किमी खोलीवर होता, अशी माहितीही राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button