Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून हलक्या पावसाचा अंदाज; ‘या’ भागात मुसळधार | पुढारी

Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून हलक्या पावसाचा अंदाज; 'या' भागात मुसळधार

पुणे : राज्यात शनिवारपासून तीन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी वर्तवला आहे. 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र मान्सून अंशत: सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात वार्‍यांची चक्रीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रात मान्सून अंशत: सक्रिय होत असल्याचा अंदाज आहे. आगामी 48 तास विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होईल. मराठवाड्यातील दक्षिण पूर्व भाग व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही भागांत शनिवारी (दि. 2), तर प्रामुख्याने बहुतांश भागात 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस होईल.

हेही वाचा

नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद

Pune News : चाळीस फुटांपेक्षा जास्त उंचीचे मंडप नको! महापालिकेचे गणेश मंडळांना आवाहन

Pune Solapur Fire : पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांना भीषण आग

Back to top button