Pune Solapur Fire : पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांना भीषण आग | पुढारी

Pune Solapur Fire : पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांना भीषण आग

दीपक देशमुख

यवत(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील सहजपुर गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला सहजपुर फाटा भागात शुक्रवारी रात्री 11:30 च्या सुमारास तीन जड वाहतूक वाहनांना अचानक आग लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या घटने मुळे पुणे सोलापूर महामार्गावर आगीचे तांडव पाहायला मिळत असून घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हजर झाले असून महामार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान आग लागण्याचे कारण अद्याप समजले नसून सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत करण्याचे काम यवत पोलिसांकडून सुरू आहे. केमिकल युक्त टँकर टेम्पो उभ्या असणाऱ्या ट्रेलरला धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अग्निशामक दल सदर ठिकाणी पोचले नसून आग विझवण्यासाठी तूर्तास तरी कोणतेही साधनसामग्री उपलब्ध नाही. या अग्निकांडामुळे पुणे सोलापूर हायवे वरती पुण्याला जाणाऱ्या वाहनांची किमान पाच किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा

नाशिक : टेम्पोच्या धडकेत मुलगा ठार, दुचाकीस्वार गंभीर

‘त्या’ दगडावरून उलगडणार सौरमालिकेच्या प्रारंभाचे रहस्य

लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Back to top button