रायगड: सवाद येथे सावित्री नदीपात्रात मृतदेह आढळला | पुढारी

रायगड: सवाद येथे सावित्री नदीपात्रात मृतदेह आढळला

पोलादपूर, पुढारी वृत्तसेवा: पोलादपूर तालुक्यातील सवाद येथे सावित्री नदी पात्रात आज (दि.१) सकाळी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पाठविण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

या घटनेची माहिती सवाद गावाचे पोलीस पाटील अभिषेक बुडबाडकर यांनी पोलादपूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाड येथील साळुंके रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंखे, आयान तारलेकर, रुपेश चव्हाण, ओमकार जाधव, रोहन पवार, नितेश पवार, अनिल चव्हाण, सरफराज तारलेकर, अभिषेक बुडबाडकर यांनी मृतदेह नदीतून बाहेर काढला.

मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button