रायगड : मांडले धबधबा येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू! | पुढारी

रायगड : मांडले धबधबा येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू!

नाते; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील मांडले येथे असलेल्या धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. रोहित पांडुरंग अवकीरकर (वय 17) व सचिन रामचंद्र अवकीरकर (वय 17) अशी मृत्यू झालेल्या दोन युवकांची नावे आहेत. दोघेही हिरकणी वाडी येथील रहिवासी होते.

या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी व रेस्क्यू टीमच्या पथकाने समीर विचारे यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. ३१) दुपारी रोहित पांडुरंग अवकीरकर (वय 17) व सचिन रामचंद्र अवकीरकर (वय 17) या दोन युवकांसह अन्य काही शालेय युवक या मांडले येथे पोहण्यासाठी गेलेले होते. दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाकडून संदेश प्राप्त झाल्यावर रेस्क्यू टीम तातडीने त्या ठिकाणी दाखल झाली. दरम्यान या दोन मृत युवकांसह अन्य तीन सहकारी मित्र त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले आहे. महाड मधील साळुंखे रेस्क्यू टीमने तसेच समीर विचारे यांच्या टीमसह ॲडव्हेंचर सोल टीम यांनी सायंकाळी उशीरा या दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने किल्ले रायगड परिसरातील हिरकणी वाडी येथे पूर्णपणे शोककळा पसरल्याचे दिसून येत आहे.

 

Back to top button