पुणे : दिवसभर ऊन; सायंकाळी हलक्या सरी | पुढारी

पुणे : दिवसभर ऊन; सायंकाळी हलक्या सरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात दिवसा कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाल्याने शनिवारी (दि. 26) उकाडा वाढला होता. मात्र, सायंकाळी हलक्या सरी बरसल्याने हायसे वाटले. शहरात सरासरी 1 मि. मी. पावसाची नोंद झाली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. सकाळी 9 वाजताच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. आकाशात ढगांची गर्दी असली तरी सतत ऊन, पावसाचा लंपडाव सुरू आहे.

पावसाचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. कडक ऊन आणि रिमझिम पाऊस असे दर दोन तासांनी वातावरण बदलत आहे. शनिवारी सकाळी कडक उन्हाने दिवसाची सुरुवात झाली. मात्र, दुपारी बारा वाजता हलकी सर आली. शहरातील काही भागात हा पाऊस झाला. टिळक रस्ता ते शिवाजीनगर, बाजीराव रस्ता या मार्गावर पाऊस होता. उपनगर परिसरात मात्र पाऊस नव्हता. सायंकाळी 6 वाजता आकाश पुन्हा ढगांनी झाकोळून आले अन् हलक्या सरी कोसळू लागल्या. यामुळे तापमानात घट झाली.

आगामी 72 तास हलक्या सरी
पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात पश्चिमी वार्‍यांचा प्रभाव वाढल्याने शहरावर बाष्पयुक्त ढगांची गर्दी होत आहे. त्यामुळे आगामी 72 तास शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

Back to top button