ISRO to PM Modi : 'धन्यवाद पंतप्रधान'... 'इस्रो'ने केली खास पोस्ट | पुढारी

ISRO to PM Modi : 'धन्यवाद पंतप्रधान'... 'इस्रो'ने केली खास पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्रीस दौर्‍यावरुन आज (दि. २६) परतले. यानंतर ते थेट बंगळूरु येथे गेले. त्‍यांनी भारतीय अंतराळ विकास संशोधन संस्‍थेच्‍या (इस्रो) प्रमुखांसह संशोधनांची भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले. यानंतर त्‍यांनी आपल्‍या भाषणातून इस्रोच्‍या ऐतिहासिक कामगिरीबाबत कौतुक केले. पंतप्रधानांच्या भाषणानंतर आता इस्रोनेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे आभार मानले आहेत. (ISRO to PM Modi )

इस्रोने म्‍हटले आहे की, “पंतप्रधान मोदी जी इस्रो आणि भारतीय विज्ञान समुदाय तुमच्या कौतुक, पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या भाषणाने आपल्या राष्ट्रासाठी आणि मानवतेसाठी मोठ्या यशासाठी नूतनीकरण करणाऱ्या शास्त्रज्ञांसह वैज्ञानिकांना खूप प्रेरणा दिली.” (ISRO to PM Modi )

मी सहजासहजी अस्वस्थ होत नाही, परंतु चांद्रयान ३च्‍या लँडिंग दिवशी अस्‍वस्‍थ होतो. त्‍यावेळी मी दक्षिण आफ्रिकेत होतो, पण माझे मन फक्त भारतात होते, असेही पंतप्रधानांनी आपल्‍या भाषणात नमूद केले होते.

हेही वाचा :

 

Back to top button