Women Scientist in ISRO | चांद्रयान-३ : ‘इस्रो’च्या महिला शास्रज्ञांनी पीएम मोदींच्या भेटीवर व्यक्त केला आनंद (व्हिडिओ) | पुढारी

Women Scientist in ISRO | चांद्रयान-३ : 'इस्रो'च्या महिला शास्रज्ञांनी पीएम मोदींच्या भेटीवर व्यक्त केला आनंद (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चांद्रयान-३ मोहिम यशस्वी करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची बंगळूर येथे आज (दि.२६) भेट घेतली. या दरम्यान, चांद्रयान- ३ मोहिमेत सहभाग असलेल्या महिला शास्त्रज्ञांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘प्रज्ञान’ रोव्हर टीमच्या सदस्या रिमा घोष यांनी ‘प्रज्ञान’ रोव्हर हा आमच्यासाठी बाळासारखा आहे अन् या बाळाने चंद्रावर पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. असे म्हणत या मोहिमेविषयी (Women Scientist in ISRO) तसेच पीएम मोदींच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.

पीएम मोदी यांच्या संबोधनानंतर या मोहिमेतील काही महिला सदस्यांनीही आपला आनंद व्यक्त केला आहे. पुढे बोलताना रोव्हर टीमच्या सदस्या रिमा घोष यांनी म्हटले आहे की, आम्ही खूप आनंदी आहोत, पीएम मोदींची भेट आश्चर्यकारक होती. मोदींनी आमच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. मी प्रज्ञान टीममध्ये काम करत होते. माझ्यासाठी, ‘प्रज्ञान’ हा लहान बाळासारखा आहे आणि या बाळाने चंद्रावर पावले टाकण्यास सुरूवात केली (Women Scientist in ISRO) आहे. हा एक अद्भुत अनुभव आहे, असेही त्या म्हणाल्या.

पीएम मोदी यांनी आमच्या कामाची दखल घेत आमच्या प्रयत्नांची आणि त्यागाची प्रशंसा केली. येथून आम्ही आणखी काहीतरी चांगले घेऊन बाहेर पडणार आहोत. पीएम मोदी म्हणाले की, आकाशाला मर्यादा नाही, तसेच आम्ही देखील आणखी आव्हानात्मक मिशन्स, स्वप्न घेऊन येथून बाहेर पडत आहे. मार्स लँडिंग मिशन, आदित्य-एल1 मिशनसह या योजनेतील अनेक मोहिमा लवकरच प्रक्षेपित केल्या जातील, असेही इस्रोच्या शास्रज्ञ रीमा घोष (Women Scientist in ISRO) यांनी म्हटले आहे.

Women Scientist in ISRO : पीएम मोदी यांचे भाषण प्रेरणादायी- इस्रो शास्त्रज्ञ पद्मावती

पीएम मोदी यांनी चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ हे नाव दिले आहे. चांद्रयान-२ च्या लँडिंगसाठी त्यांनी ‘तिरंगा’ हे नाव दिले होते. पीएम मोदींचे आजचे भाषण आमच्यासाठी प्रेरणादायी होते. पंतप्रधानांच्या भेटीमुळे इस्रोमधील वातावरण उत्साहवर्धक झाले आहे. खरोखरच ते आमचे पंतप्रधान आहेत हा आमचा सन्मान आहे. हे आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचेही इस्रो शास्त्रज्ञ पद्मावती यांनी म्हटले आहे.

पीएम मोदींची भेट अविस्मरणीय अनुभव – सरिता रेड्डी (वरिष्ठ शास्त्रज्ञ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. पीएम मोदींची भेट आमच्या सर्वांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता, असे मत इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सरिता रेड्डी व्यक्त केले. पीएम मोदींच्या भेटीबद्दल माध्यमांशी त्या बोलत होत्या.

आमच्यासाठी आनंदाचा क्षण- वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅफिनी

पंतप्रधानांशी संवाद साधणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांनी विशेषतः महिला शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यू आर राव सॅटेलाइट सेंटरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅफिनी यांनी म्हटले आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅफिनी यांचा चांद्रयान-3 च्या मोहिमेतही सहभाग होता.

आमचे पंतप्रधान ‘नारी शक्ती’ ओळखतात – प्रियंका मिश्रा

आम्ही खूप उत्साही आहोत. आमचे पंतप्रधान ‘नारी शक्ती’ ओळखतात. त्याला प्रोत्साहित करतात हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रियंका मिश्रा या यू आर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये काम करतात. त्यांनी चांद्रयान-३ मोहिमेत प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरसाठी काम केले आहे.

चांद्रयान-३ सारखे ‘गगनयान’साठीही सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- अर्थी सेन

चांद्रयान-3 हे गगनयानसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे, यासाठी आम्ही तयार आहोत. गगनयानसाठी आमची कामे सुरू आहेत. गगनयानचे परिणाम लवकरच दिसू शकतात. या मोहिमेची प्रक्रिया सुरू झाली असून, गगनयानसाठीही सर्वांचे सहकार्य हवे आहे, असे मत इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ अर्थी सेन यांनी म्हटले आहे.

चांद्रयान-३ ही जादू सत्यात उतरताना पाहिली -निधी पोरवाल (वरिष्ठ शास्त्रज्ञ)

चांद्रयान-३ ही जादू आहे जी आम्ही आमच्या डोळ्यांसमोर सत्यात उतरताना पाहिली आहे. या मिशनच्या यशासाठी आम्ही दीर्घकाळापासून सातत्याने करत होतो. हा क्षण खरा करण्यासाठी एका अतिशय मजबूत टीमने या चार वर्षांपासून रात्रंदिवस काम केले आहे. पीएम मोदी हे कुटूंबप्रमुख आहेत. त्यांच्या भेटीने आम्हाला आनंद आणि प्रेरणा देखील मिळाली, असे मत इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ निधी पोरवाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button