नागपूर : विरोधी पक्षनेत्यांची काँग्रेसमधील शेवटची निवडणूक : सुधीर मुनगंटीवार | पुढारी

नागपूर : विरोधी पक्षनेत्यांची काँग्रेसमधील शेवटची निवडणूक : सुधीर मुनगंटीवार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा विरोधी पक्ष नेत्यांनी ते कधीच भाजपमध्ये येणार नाहीत, एवढं जरी जाहीर केलं, तरी ही कोणाची निवडणूक पहिली आणि कोणाची शेवटची, हे लोकांच्या लक्षात येईल. ही त्यांची, काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते अशा वातावरणात ते आहेत. यापूर्वीची त्यांचीच पक्ष नेतृत्वाबद्दलची विधाने बघितली पाहिजेत, केवळ हास्यास्पद विधान करण्यात काही अर्थ नाही अशी चपराक भाजपचे ज्येष्ठ नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लगावली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, वडेट्टीवार अशी विधाने करून ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र, हा त्यांचा गैरसमज आहे. सध्याच्या वातावरणात शरद पवार यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम आहे.

दरम्यान, नागपूर विद्यापीठात भाजप, संघ इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याविषयी छेडले असता, ते म्हणाले केवळ भाजप कसा अभ्यासक्रमात असेल, इतिहासामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड शिकवतो. त्यामुळे पंडित नेहरूही शिकवले जातील आणि नरेंद्र मोदी ही शिकवले जातील. राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस, समाजवादी आणि भाजप अशा सर्व राजकीय पक्षांचा इतिहास शिकवला जाईल.

हेही वाचा : 

Back to top button