Swiggy IPO: स्विगी आयपीओ आणण्याच्या तयारीत; जाणून घ्या काय आहे शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना | पुढारी

Swiggy IPO: स्विगी आयपीओ आणण्याच्या तयारीत; जाणून घ्या काय आहे शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना

अक्षय मंडलिक

पुढारी ऑनलाईन: भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. आता या आयपीओ संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. कंपनी 2024 पर्यंत आपला आयपीओ बाजारात आणू शकते. कंपनी बर्‍याच दिवसांपासून आयपीओ आणण्याचा विचार करत होती, परंतु बाजारात झालेल्या उलथापालथीमुळे तिने काही काळासाठी आपली योजना थांबवली होती.

 8 बँकांशी बोलणी सुरू

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी आयपीओ आणण्यासाठी त्याच्या मूल्यांकनासाठी बँकांशी बोलत आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, स्विगीने 2022 मध्ये बाजारातून शेवटचा निधी गोळा केला होता. त्यावेळी कंपनीचे मूल्यांकन 10.7 अब्ज डॉलर होते. पण बाजाराची वाईट परिस्थिती आणि बाकीचे ढासळत चाललेले भारतीय स्टार्टअप्स पाहता कंपनीने आपला आयपीओ प्लॅन काही दिवसांसाठी पुढे ढकलला होता, पण आता पुन्हा एकदा स्विगीच्या आयपीओची चर्चा वाढली आहे.

आयपीओ योजनेवर काम करताना, कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये आठ गुंतवणूक बँकर्सशी बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणूक बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन अँड सर्टेनली सारख्या दिग्गजांची नावे समाविष्ट आहेत.

IPO कधी येणार

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनी सतत आपल्या आयपीओवर काम करत आहे आणि यासाठी वेगवेगळ्या बँकांशी बोलत आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार झाले तर कंपनीचा आयपीओ जुलै ते सप्टेंबर 2024 दरम्यान येऊ शकतो. सध्या स्विगी आयपीओमध्ये 10.7 बिलियन डॉलरचे मूल्यांकन मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कंपनी किंमत किती ठरवते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा:

पुणे : पीएमपी बसचालकांच्या संपाचा प्रवाशांना फटका

पुणेः दोन कोटींचे मोबाईल चोरणार्‍या टोळीतील एकाला अटक

पुणे : अपहरण करून डॉक्टरला लुटणारी टोळी जेरबंद

 

Back to top button