शरद पवार, सुप्रिया सुळेही मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील : बावनकुळे | पुढारी

शरद पवार, सुप्रिया सुळेही मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील : बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : देशात २०१९ पेक्षा जास्त बहुमत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला मिळेल. केंद्र सरकारच्या ९ वर्षाच्या कामामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे देखील मनपरिवर्तन होईल. शरद पवार व सुप्रिया सुळे हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या जनसंपर्क अभियानांतर्गत ते माध्यमांशी बोलत होते.

यासोबतच खासदार नवनीत राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे आवाहन करीत अमरावतीतला खासदार व्हावा, हा आमचा २०२४ चा आग्रह असेल, यावर भर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्याच्या बाहेर प्रभाव नाही असे म्हणणे योग्य नाही. २१ शतकात भारताच्या भक्कम निर्मितीची क्षमता फक्त मोदींमध्ये आहे. हे अजित पवारांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात आम्ही महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू आणि विधानसभेत २०० पेक्षा जास्त जागा जिंकू. कुठल्याही पक्षात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल, तर लोकशाहीने त्यांना तो दिलेला अधिकार आहे. कोणताही शेतकरी अडचणीत येणार नाही, याची तयारी केंद्र सरकारने केली आहे, यावर एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा 

Back to top button