संग्रहित छायाचित्र
Latest
चंद्रपूर लोकसभेसह राज्यातील ४५ जागा भाजप मित्रपक्ष जिंकेल : चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये चंद्रपूर लोकसभेसह राज्यातील 45 जागा भाजप मित्रपक्षासह जिंकेल असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपच्या संपर्क से समर्थन व घर चलो अभियानाची सुरुवात आज (दि. २०) चंद्रपूर येथून करण्यात आली. यावेळी ते चंद्रपूरात आले असता माध्यमांशी बोलत होते.
भाजपच्या वतीने आजपासून (दि. २०) चंद्रपूरातून 'संपर्क से समर्थन' व 'घर चलो अभियाना'चा शुभांरभ करण्यात आला. चंद्रपुर शहरातील तुकूम भागात घर चलो अभियानांतर्गत भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या घरी जावून भेटी घेतल्या. गेली नऊ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध कामकाजाची माहिती घर चलो संपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली. मतदारांना उत्तरदायी असलेल्या जबाबदार पक्षाने मतदारांपर्यंत पोहचून आपल्या कार्यकाळातील पूर्ण झालेल्या वचनांची माहिती देणे आवश्यक असल्याने त्यांनी हे अभियान सुरू केल्याचे सांगितले.
या अभियानाच्या अनुषंगाने, माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा मानस व्यक्त केला. भाजप मित्रपक्षासह सर्व जागा जिंकेल. मागील नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी, नागरिकांच्या कल्याणाकरीता काम केले असल्याने राज्यातील ४५ हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते यांनी, चंद्रपूरात भाजप लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी देशात दंगली घडवू शकतो असा खळबळजनक आरोप काल शनिवारी केला होता. त्यावर बोलताना बावणकुळे यांनी, वड्डेटीवार यांचाही समाचार घेतला. वड्डेटीवार यांना मिळालेले विरोधीपक्ष नेते पद एक संविधानिक पद आहे. अश्या पदावर विराजमान असताना बेताल वक्तव्य करणे चुकीच पूर्णत: चुकीचे आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे यामुळे समाजात जाती धर्मात तेढ निर्माण होऊ शकते. जर त्यांच्याकडे कुठल्याही दंगली बाबतच माहिती असेल तर त्यांनी त्यांनी सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे द्यावी आणि भविष्यात दंगली बाबत वक्तव्य करू नये अशी समज दिली. भूजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी बोलण्याचे टाळले. ते काय बोलले हे आपल्या माहितीनसून जर ते कोण्या समाजाबद्दल बोलले असतील तर योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

