सपा नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा | पुढारी

सपा नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने खान यांना त्यांच्या आवाजाचे नमुने देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली आहे. खान यांनी रामपूर न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती खान यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आली होती.

२००७ मध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण करीत अवमानजनक भाषेच्या वापर केल्या प्रकरणात आवाजाचा नमुना देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला खान यांनी आव्हान दिले होते.आझम यांनी २५ जुलैला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. न्यायालयाने आझम यांची याचिका फेटाळत रामपूर न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवले होते.

हेही वाचा 

Back to top button