सपा नेते आझम खान यांना झटका, आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी दोन वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा | पुढारी

सपा नेते आझम खान यांना झटका, आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी दोन वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांना आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी ( Hate Speech Case ) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्‍यांना दोन वर्षांचा कारावास आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आझम खान सध्‍या न्यायालयीन कोठडीत आहेत.
काय होते प्रकरण?
१८ एप्रिल २०१९ रोजी धामारा गावात एका जाहीर सभा झाली होती. यावेळी आझम खान यांनी घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या प्रकरणी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी शनिवारी आझम खान यांना आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

आझम खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून शिक्षेच्या प्रश्नावर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्यानंतर आझम खानला दोन वर्षांचा कारावास आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

 

Back to top button