Asia Cup 2023 : बीसीसीआय सचिव जय शहा यांना पाकिस्तानचे निमंत्रण | पुढारी

Asia Cup 2023 : बीसीसीआय सचिव जय शहा यांना पाकिस्तानचे निमंत्रण

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी (दि.१८) बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शहा यांना आशिया चषकाचा उद्घाटन सामना पाहण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील पहिला सामना दि. ३० ऑगस्ट रोजी मुलतान येथे होणार आहे. यावेळी पीसीबीने सांगितले की, जय शहा व्यतिरिक्त, आशियाई क्रिकेट परिषदेचा भाग असलेल्या इतर मंडळांच्या प्रमुखांना देखील उद्घाटन सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. (Asia Cup 2023)

पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी डरबन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत जय शहा यांना पाकिस्तानला भेट देण्याचे तोंडी निमंत्रण दिले होते. यानंतर आता मंडळाने शहा यांना औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. (Asia Cup 2023 )

जय शहा पाकिस्तानात जाणार?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय शहा यांना निमंत्रण पाठवले आहे. मात्र, बीसीसीआयचे सचिव पाकिस्तानात जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जय शहा यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारले आहे. परंतु, एका अहवालानुसार, बीसीसीआयने हा दावा फेटाळून लावला आहे.

भारत पहिल्याच सामन्यात भिडणार पाकिस्तानशी

BCCI सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शहा यांनी दि. १९ जुलैला आशिया कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले होते. ही स्पर्धा दि. ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. स्पर्धेचे पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकेत नऊ सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना दि. २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे.

भारत अ गटात आहे. पाकिस्तान आणि नेपाळही त्याच गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-४ फेरीत प्रवेश करतील. यामधून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

हेही वाचा;

Back to top button