विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलांचा वडिलोपार्जित संपत्तीवर दावा? | पुढारी

विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलांचा वडिलोपार्जित संपत्तीवर दावा?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेले मूल हिंदू कायद्यानुसार त्यांच्या आई-वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीच्या हिस्सेदारीचे हकदार आहेत की नाही, यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करत शुक्रवारी निकाल राखून ठेवला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने 2011 पासून प्रलंबित याचिकेवर अनेक वकिलांचा युक्तिवाद ऐकला.

हिंदू विवाह कायद्यातील कलम 16 (3) अंतर्गत अशा मुलांचा हिस्सा केवळ त्यांच्या आई-वडिलांच्या स्वअर्जित संपत्तीपर्यंतच मर्यादित आहे, या संबंधी देखील न्यायालय निकाल सुनावणार आहे. या प्रश्नांना 31 मार्च 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले होते. खंडपीठाने हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवले होते. अमान्य विवाहातून जन्माला आलेले मूल केवळ आई-वडिलांच्या संपत्तीवरच अधिकाराचा दावा करू शकतात. इतर संपत्तीवर नाही, असे तरतुदीतून स्पष्ट होते. या बालकांच्या त्यांच्या आई-वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कुठलाही अधिकार राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निरीक्षणावर खंडपीठाने अहसमती दर्शवली होती.

Back to top button