‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचा पुण्यात मृत्यू; कुटुंबियांनी अवयवदान करत सैन्याला दिलं जीवदान | पुढारी

'त्या' पोलिस कर्मचार्‍याचा पुण्यात मृत्यू; कुटुंबियांनी अवयवदान करत सैन्याला दिलं जीवदान

पिंपरी(पुणे) : दुचाकी अपघातात जखमी झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचा १४ ऑगस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करत माणुसकीचा आदर्श ठेवला आहे. मृत पोलिसांच्या कुटुंबीयांच्या कार्याचं सर्वस्तरावरुन कौतुक केलं जात आहे. मात्र मृत पोलिसांचं कुटुंबियांनी अवयव दान करत माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. किडनी, त्वचा, डोळे आणि ह्रदय या अवयवांचं दान केलं आहे. पुण्यातील रुबी हॉलमध्ये अवयव दान करण्यात आले. त्यांचं ह्रदय पुण्यातील 46 वर्षीय भारतीय सैन्याला दान करण्यात आले आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस मध्ये प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली आहे.

पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचा खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे (दि. 2) रात्री दीडच्या सुमारास अपघात झाला होता. कौशल्य हे दरोडाविरोधी पथकात कार्यरत होते. दरम्यान, 2 ऑगस्टला रात्री ते दुचाकीवरून जात होते. त्या वेळी मोशी येथे त्यांच्या दुचाकीला कुत्रे आडवे आले. त्याला वाचविताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून त्यांचा अपघात झाला. हेल्मेट निघून पडल्याने ते गंभीर जखमी झाले.

रात्रीची वेळ असल्याने त्यांना लवकर मदत मिळाली नाही. काही वेळाने येथून जाणार्‍या पीएमपी बसचालकाच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्याने एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी वायसीएममध्ये दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजेश यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा

कोल्हापूर हायकर्स तर्फे कारगिलमध्ये ध्वजवंदन

नागपूर : गडचिरोली पोलिसांना सर्वाधिक पोलिस पदके, मात्र नक्षलवादविरोधातील संघर्ष संपलेला नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस

लाल किल्‍यावरील साेहळ्याकडे काँग्रेस अध्‍यक्षांनी फिरवली पाठ, पक्षाने सांगितले कारण

Back to top button