

कारगिल, पुढारी वृत्तसेवा : आज सकाळी कारगिल येथील द्रास वॉर मेमोरेबल इथे स्वातंत्र्य दिन भारतीय जवानांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक सागर पाटील श्रावणी पाटील ,वृषाली माळी, सचिन शिंदे, रीना शिंदे, आयुष शिंदे,अनिश शिंदे, संभाजी महाडिक, पार्थ महाडिक, वर्षा महाडिक, इश महाडिक, किरणसिंह कदम , विशाल माळी , संदीप माने, विराज मिस्कीन, वीणा मिस्किन, शर्मिला मिस्किन, अश्विनी ठाणेकर, राम शिंदे , दिपाली पुजारी , मंगेश पांढरपट्टे , चंदू मंचेरे , तेजस्विनी मोरे , धनंजय मोरे इ. सहभागी होते गेली ११ वर्षे कोल्हापूर हायकर्स ची टीम लेह लडाख आपल्या जवानांना रक्षाबंधनानिमित्त राख्या सुद्धा बांधल्या आहेत.
त्याचबरोबर यावर्षीची लेह लडाख मोहिमेला कारगिलमधून सुरू झाली . या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातली सगळ्यांत खडतर असलेली झोजीला खिंड पार करून जगातील दोन नंबरचे नंबर थंड हवेचे ठिकाण द्रास या ठिकाणाला पोहचता येते कारगिल चे युद्ध झालेले ठिकाण म्हणजेच वॉर मेमोरियल व विजयदिन साजरा करण्यात येतो ते हेच ठिकाण.कारगिल नंतरचा टप्पा लडाख मधील लेह गावतील प्राचीन संस्कृती व लमाज लोकांनाची मॉनेस्ट्रीला भेट देणार आहोत.
पवित्र नदी सिंधू नदीचा घाट या ठिकाणी भेट आहे. निसर्गरम्य नुब्रा व्हँली (जिथे एकच ठिकाणी वाळवंट , बर्फ , हिरवळ असते)या ठिकाणीण दोन पाठ असणारे उंट पाहायला मिळतात १९७१ चा भारत पाक युद्ध नंतर भारतामध्ये सामील झालेले गाव तूर्तुक हे गाव तसेच१८३८० फूट उंचीवरील जगातील सर्वात रस्त्यावरुन चायना बॉर्डर वर असणारे पेंगोंग तलाव पाहणार आहे..
कोल्हापूर हायकर्स गेले सलग अकरा वर्ष विविध व अनोखे उपक्रम साजरे करते गडकिल्ल्यांच्या मोहिमा, धनत्रयोदशीदिवशी पन्हाळ्यावरील दीपोत्सव,रायगडावरील शिव राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशातील विविध ठिकाणाहून जल संकलन मोहीम राबवली जाते.