Foxconn प्रकल्प अखेर तेलंगणात! ५५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक | पुढारी

Foxconn प्रकल्प अखेर तेलंगणात! ५५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

पुढारी ऑनलाईन : ॲपलची सर्वात मोठी पुरवठादार कंपनी FIT Hon Teng Ltd (Foxconn) च्या संचालक मंडळाने तेलंगणामध्ये ४० कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. फॉक्सकॉन इंडियाचे प्रतिनिधी व्ही ली यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे. तैवान येथील कॉन्ट्रॅक्ट मॅन्यफॅक्चरर फॉक्सकॉन ही ॲपलची सर्वात मोठी पुरवठादार कंपनी आहे. आधीच्या १५ कोटी डॉलर्ससह Foxconn ची तेलंगणातीला एकूण गुंतवणूक ही ५५ कोटी डॉलर्सची असणार आहे.

“…FIT सिंगापूरचा चँग यी इंटरकनेक्ट टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला ४० कोटी डॉलर्स गुंतवणूक प्रकल्प देण्याचा प्रस्ताव आहे, जो FIT सिंगापूरकडे भांडवली स्टॉकच्या ९९.९९ टक्के आहे,” असे फॉक्सकॉनने हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजला क‍ळवले आहे.

“तेलंगणा खूप वेगाने प्रगती करत आहे! इथे आणखी ४० कोटी डॉलर्सची गुंतवणूक येत आहे.” असे व्ही ली यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

व्ही ली यांच्या पोस्टवर तेलंगणाचे आयटी आणि उद्योग मंत्री केटी रामा राव यांनी शनिवारी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. नवीन गुंतवणुकीचा प्रस्ताव आधीपासून वचनबद्ध असलेल्या १५ कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त आहे, असे राव यांनी म्हटले आहे.

“फॉक्सकॉन समूहासोबतचे आमचे मैत्रीपूर्ण संबंध मजबूत आहे. आम्ही परस्पर वचनबद्धतेचे पालन करतो. एकूण ५५ कोटी डॉलर्स (आधीचे १५ कोटी डॉलर्ससह) फॉक्सकॉन तेलंगणात त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. ही गुंतवणूक पुन्हा एकदा तेलंगणाचा वेग सिद्ध करते,” असे रामा राव यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दिग्गज असलेल्या फॉक्सकॉन इंटरकनेक्ट टेक्नॉलॉजीने मे महिन्यात तेलंगणामध्ये त्यांच्या ५० कोटी डॉलर्स गुंतवणुकीचा एक भाग म्हणून नवीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सुविधेचा पाया घातला होता.

या वर्षाच्या सुरुवातीला फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची येथे भेट घेतली होती.

हे ही वाचा :

Back to top button