रत्‍नागिरी : पॅरोलची रजा संपूनही हजर न झालेल्‍या आरोपीवर गुन्हा दाखल | पुढारी

रत्‍नागिरी : पॅरोलची रजा संपूनही हजर न झालेल्‍या आरोपीवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा पॅरोल (संचित) रजेची मुदत संपल्यावरही कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात हजर न झालेल्या रत्नागिरीतील आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मुईन मोहम्मद युसूफ काझी उर्फ मोईन उर्फ रॉनी ब्रिगेनझा उर्फ हेमंत शहा (रा. आशियाना मंझिल आशीर्वाद सोसायटी उत्कर्षनगर कुवारबाव, रत्नागिरी ) असे संबंधीत आरोपीचे नाव आहे.

या आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला या गुन्ह्यात न्यायालयाने 2015 साली जन्मठेप आणि 12 हजार दंड तो न भरल्यास 14 महिने करावासाची शिक्षा सुनावली होती.

ही शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान पश्चिम विभाग येरवडा, पुणेचे कारागृह उपमहानिरीक्षकांच्या आदेशानुसार या आरोपीला 8 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या 28 दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले होते. परंतु रजेचा कालावधी संपल्यावर तो 5 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात हजर झालेला नाही. त्यामुळे अनधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य करत असल्यामुळे त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button