खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण; शिंदे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल | पुढारी

खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण; शिंदे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील एका मुझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण करून धमकाविल्याप्रकरणी मागाठाणेतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेसह पीए पद्दमाकर सुर्यवंशी, मनोज मिश्रा, विकी शेट्टी आणि १० ते १२ अनोळखी इसमांविरोधात वनराई पोलिसांनी गुरुवार, ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे.

गोरेगाव पूर्व परिसरातून व्यावसायिक असलेले राजकुमार सिंह यांचे ग्लोबल मुझिक जक्शन प्रा.लि. नावाची असुन सदर कंपनी डिजीटल लॅटरल स्वरूप ठेवून कंपनी लोन देण्याचे काम करते. यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. हे अपहरण कथितरित्या बंदुकीचा धाक दाखवत झाले. या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयात सुमारे १० ते १५ लोक घुसले आणि म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकरणात जे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज समोर आले त्यामध्ये १० ते १५ लोक कथितपणे कर्मचार्‍यांना शिवीगाळ करताना आणि एका व्यक्तीला बळजबरीने त्यांच्यासोबत नेताना दिसत आहेत. राजकुमार सिंगच्या म्हणण्यानुसार, करारनामा रद्द करण्यासाठी शिवीगाळ, मारहाण केली. मनोज मिश्रा याच्याबरोबर वर्षाचा करारनामा केला होता. मात्र मनोज मिश्राने पैसे परत न करता हा करारनामा जबरदस्तीने रद्द करण्याकरता शिवीगाळ आणि मारहाण केली. नंतर आपल्याला कार्यालयातून खेचून कारमध्ये बसवून आ. प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर पूर्व इथल्या युनिवर्सल हायस्कूल जवळील कार्यालयात आणले. नंतर आपल्याकडून जबरदस्तीने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा याच्यासोबत केलेला करारनामा रद्द झाला, असे लिहून घेतले, असे सांगितले. याप्रकरणी वनराई पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button